ब्रह्मदेवांच्या आणि देवर्षी नारदांच्या आज्ञेप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी रामचरित्र लेखनास सुरुवात केली. सत्यप्रिय रामांनी केलेल्या सर्व कार्य वाल्मिकींना दिसू लागले. अयोध्येत रावण वधानंतर प्रभू रामांनी सीतेचा त्याग केला. ती महर्षी वाल्मिकींच्याच आश्रमात आली. तीला जुळी मुलं झाली तीच लव-कुश. महर्षींनी दोन्ही राजकुमारांना अस्त्र-शस्त्र विद्या, राजविद्या, गायनकलेत प्रवीण केले. अयोध्येत प्रभू रामांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला. महर्षी वाल्मिकीही लव-कुश समवेत यज्ञमंडपात आले आणि त्यांनी रामचरित्र गायनास सुरुवात केली. कानात प्राण आणून मंत्रमुग्ध होऊन सभा लव-कुशाच्या तोंडून श्रीरामचरित्र ऐकण्यात गुंग होती.

#LokmatBhakti #JaiShriRam #Ramayan #Ramayankatha #Ram #Laxman #Seeta
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा